प्रफुल्ल कुकडे यांना लक्ष्यवेधी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

अमरावती /3 जून: सामाजिक परिवर्तन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सातत्याने योगदान देणारे साथी प्रफुल्ल कुकडे यांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘लक्ष्यवेधी कार्यकर्ता पुरस्कार-2026’ साठी निवड करण्यात आली आहे.तसेच आम्हा अनिस शाखा अमरावती ला पण शाखा म्हणून हा लक्षवेधी पुरस्कार त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल घेत जाहीर करण्यात आला आहे.
विवेक जागर संस्था प्रकाशित आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मार्फत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. प्रफुल्ल कुकडे यांनी अमरावती जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक विचारांचा प्रसार, सामाजिक प्रबोधन आणि जनजागृतीसाठी केलेल्या बहुमोल कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधन क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजामध्ये विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी मूल्ये रुजविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.




