टीईटीपास करण्यासाठी शिक्षकांना आता 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदत

सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल जाहीर

नवी दिल्ली/29 मे-महाराष्ट्रासह देशभरातील लाखो शिक्षकांना सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी काहीसा दिलासा दिला आहे. त्याचवेळी कोर्टाने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच ढएढ सर्व शिक्षकांना बंधनकारक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. याबाबतच्या सर्व पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात देशातील शाळांमधील सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य असल्याचा आदेश दिला होता. यातून पाच वर्षांपेक्षा कमी सेवा उरलेल्या शिक्षकांना वगळण्यात आले होते. मात्र, त्यांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण व्हावे लागेल, असे कोर्टाने म्हटले होते. या निकालानंतर अनेक पुनर्विचार याचिका दाखल झाल्या होत्या. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत (ढएढ) सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या अंतिम निकालात देशभरातील आणि महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांना एक वर्षाची मुदतवाढ देऊन मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी ढएढ परीक्षा उत्तीर्ण असणे पूर्णपणे अनिवार्य राहील, परंतु ती पास करण्यासाठी आता 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. जस्टिस दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने विविध राज्य सरकारे आणि शिक्षक संघटनांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकांवर आज हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील प्रमुख मुद्दे TETपरीक्षेतूनसूट देण्यास नकार: राइट टू एजुकेशनअ‍ॅक्ट (ठढए) लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या किंवा सध्या सेवेत असलेल्या कोणत्याही शिक्षकाला TET परीक्षेतून पूर्ण सूट देण्याची मागणी कोर्टाने स्पष्टपणे फेटाळली आहे. मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांची पात्रता आवश्यक आहे, असे कोर्टाने नमूद केले. एक वर्षाची मुदतवाढ: यापूर्वीच्या आदेशानुसार शिक्षकांना 31 ऑगस्ट 2027 पर्यंत TET उत्तीर्ण होण्याची मुदत होती, ती आता एक वर्षाने वाढवून 31 ऑगस्ट 2028 अशी करण्यात आली आहे. 5 वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्यांना सवलत: ज्या शिक्षकांच्या निवृत्तीला (सेवेला) 5 वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, त्यांना नोकरीत राहण्यासाठीTET अनिवार्य नसेल, मात्र त्यांना पुढील पदोन्नती मिळवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करावीच लागेल.

संबंधित बातम्या

Back to top button