बारामती पोट निवडणुकीत 59.27 टक्के मतदान
सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई/23 एप्रिल- पश्चिम बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन ठिकाणी पोटनिवडणुका होत आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने बारामतीची पोट निवडणूक लागली, तर राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दुखद निधनाने राहुरीमध्ये निवडणूक होत आहे. आयोगाने दिलेल्या अधिकृत आकेडवारीनुसार, महाराष्ट्रत सायंकाळी 6 पर्यंत बारामतीमध्ये 59 टक्के, तर राहुरीमध्ये 56.72 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. बारामती पोट निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, विरोधी उमेदवारांमध्ये एकही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार रिंगणात नसल्याने निवडणूक पूर्णपणे एकतर्फी पार पडल्याचे चित्र आहे. विरोधी उमेदवारांनी केवळ उमेदवारी कायम ठेवली, मात्र प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नाही
पुण्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या दोन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली होती. या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. तर राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर अक्षय कर्डिलेनशीब अजमावत आहेत. बारामती विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सायंकाळी 6 वाजेपर्यंत 59.27 टक्के मतदान झाले. बारामतीमध्ये 384579 इतके मतदार आहेत, त्यापैकी 202808 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. तर राहुरीमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत 56.72 टक्के मतदान झाले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज बूथ क्रमांक 233 काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला.




