शिक्षक समिती शाखा धामणगावचे त्रैवार्षिक अधिवेशन

तालुकाध्यक्षपदी योगीराज मोहोड तर सरचिटणीसपदी विवेक ठाकरे यांची फेरनिवड

अमरावती/10 एप्रिल-धामणगाव रेल्वे- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या धामणगाव रेल्वे शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन 9 एप्रिल रोजी जुना धामणगाव येथील लोया भवनमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले असून या मेळाव्यात शिक्षकांच्या संघटनात्मक बळकटीकरणाचा संकल्प करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या या अधिवेशनाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार यांच्या हस्ते पार पडले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा नेते तथा शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष गोकुळदास राऊत यांनी भूषवले. याप्रसंगी राज्याध्यक्ष विजय कोंबे यांची विशेष उपस्थिती होती. धामणगाव शाखेच्या वतीने विजय कोंबे यांचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या मेळाव्यात आगामी तीन वर्षांसाठी धामणगाव रेल्वे तालुका कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी योगीराज मोहोड तर सरचिटणीसपदी विवेक ठाकरे आणि कार्याध्यक्षपदी विक्रांत टेकाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. महिला आघाडीमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून रूपाली देशमुख तर सरचिटणीसपदी सविता सुपठकर यांची नियुक्ती झाली. याशिवाय सचिन मानकर, केशव पोटे आणि करुणा भभूतकर यांचीही जिल्हा स्तरावरील विविध पदांवर निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या अधिवेशनाला राजेश सावरकर, प्रविणा कोल्हे, संभाजी रेवाळे, शैलेंद्र दहातोंडे, प्रशांत निमकर, नंदकिशोर पाटील आणि मनिष काळे यांसह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक योगीराज मोहोड यांनी केले तर संचालन करुणा भभूतकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशासाठी धामणगाव तालुक्यातील शिक्षक समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Back to top button