पी.आर.पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे उन्हाळी शिबीर

अमरावती /9 एप्रिल: पी.आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूल अमरावती येथे उन्हाळी शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये चित्रकला, हस्तकला, नृत्य, संगीत, योगा, क्रीडा तसेच व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रांतील प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. शाळेच्या प्राचार्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढतो.




