अंबादेवी मंदिर परिसरातील हनुमान मंदिरात फळांची आरास
मनमोहक सजावटीने भाविक मंत्रमुग्ध

* सकाळपासून दर्शनासाठी गर्दी
अमरावती /2 एप्रिल– अंबादेवी मंदिराजवळील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी फळे आणि फुलांची आकर्षक सजावट केली होती. पहाटे ठीक 5 वाजता अभिषेक आणि 6 वाजता जन्मोत्सव आरती उत्साहात पार पडली.
यावेळी प्रकाश सोमाणी, सुरेश सोमाणी, मनोज डागा, संजय हिंगासपुरे, सुभाष उपरकर, किशोर रघुवंशी, श्यामजी मुळे, सागर सोमाणी, अजय खंडेलवाल, प्रवीण आष्टीकर, विनोद पांचाळ, रवी पांडे, श्रीकांत बाल्टे आदी उपस्थित होते. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरात बुंदीच्या प्रसादासोबतच फळांचे वाटप करण्यात आले. हनुमंताच्या मूर्तीला चांदीचा वरख लावून सजवण्यात आले होते. भाविकांनी कापसाच्या फुलांचे हार, श्रीफळ, मोतीचूर लाडू आणि चणा-गूळ यांचा नैवेद्य श्रद्धेने अर्पण केला.




