धनराज लेनमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
पंजिरी प्रसादाचे वाटप

* भाविकांची दर्शनासाठी गर्दी
अमरावती/2 एप्रिल – धनराज लेन परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे 6 वाजता विधिवत महाआरती करण्यात आली. यावेळी परिसरातील गणेशीवाल परिवार, विनोद डागा, मोहनलाल दायमा, प्रवीण दायमा, नवल दायमा यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
भाविकांनी जय बजरंग बलीचा जयघोष करत मारुतीरायाला श्रीफळ, कापसाच्या फुलांचा हार आणि पंजिरीचा प्रसाद अर्पण केला. पंजिरी प्रसादाचे यजमान राजेश अग्रवाल आणि अनिल अग्रवाल होते. त्यानंतर माहेश्वरी भवन येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी दिनेश गणेशीवाल, अशोक परमार, प्रशांत खंडेलवाल, पवन रेड्डी, अनुप मंगरोलिया, आप्पा कुर्हे आदींची उपस्थिती होती.




