प्रयागराज हनुमान मंदिरात अखंड रामायण पठण
हनुमान जन्मोत्सव सोहळ्याला भक्तीमय प्रारंभ, महाप्रसाद आणि अभिषेकाचे जय्यत नियोजन

अमरावती/1 एप्रिल ; स्थानिक मांगीलाल प्लॉट परिसरातील श्री प्रयागराज पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल सुरू झाली आहे. सोमावारी सकाळी आठ वाजता विधीवत पूजनाने ’अखंड रामायण’ पठणाचा श्रीगणेशा करण्यात आला असून, यामुळे संपूर्ण परिसर रामनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंदिरात मोठ्या उत्साहात उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवारी हवन आणि पूजनाने रामायण पठणाची सांगता झाली. गुरुवारी, 2 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजल्यापासून पवनपुत्राचा जलाभिषेक आणि महाआरतीचा सोहळा रंगणार असून, सायंकाळी सहा स्थानिक मांगीलाल प्लॉट परिसरातील श्री प्रयागराज पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल सुरू झाली आहे. सोमावारी सकाळी आठ वाजता विधीवत पूजनाने ’अखंड रामायण’ पठणाचा श्रीगणेशा करण्यात आला असून, यामुळे संपूर्ण परिसर रामनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंदिरात मोठ्या उत्साहात उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवारी हवन आणि पूजनाने रामायण पठणाची सांगता झाली. गुरुवारी, 2 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजल्यापासून पवनपुत्राचा जलाभिषेक आणि महाआरतीचा सोहळा रंगणार असून, सायंकाळी वाजल्यापासून भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
या उत्सवासाठी मंदिर समितीने कंबर कसली असून गावकर्यांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीत भक्तीचा मळा फुलला आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शैलेंद्र मिश्रा, सुभाष मिश्रा, आनंद मिश्रा, अशोक तिवारी, रामेश्वर मिश्रा, डॉक्टर अमोल मोहाड, आनंद त्रिपाठी, पुष्पराजसिंह ठाकूर, सुरेश मिश्रा, प्रेमकुमार पांडे, संतोष यादव आणि राजेंद्रप्रसाद मिश्रा यांसारखी मंडळी अहोरात्र कष्ट घेत आहेत. या मंगलमय वातावरणात पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
श्रद्धेचा जागर-मांगीलाल प्लॉट येथील हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीचा महापूर लोटला आहे. अखंड रामायण पठणाने आसमंत भारावून गेला असून, गुरुवारी होणार्या महाप्रसादासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी सज्ज झाली आहे. हनुमान भक्तांसाठी हा सोहळा म्हणजे एक मोठी पर्वणीच ठरत आहे.




