जिल्हा संघटनेचे सचिव राजकुमार चैनानी यांचा सत्कार

अमरावती /24 मार्च : सेवानिवृत्त शिक्षेकेत्तर संघ पुणे व महाराष्ट्र राज्य शिक्षेकेत्तर महासंघ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा संघटनेचे सचिव श्री. राजकुमार चैनानी यांचा सत्कार सोहळा पुणे येथे ब्राह्मण सभा मंगल कार्यालय सदाशिव पेठ पुणे येथे पार पडला. चैनानी यांनी राज्य शासकीय कर्मचार्‍यांना मिळणार्‍या 12 व 24 वर्षाच्या आश्वासत प्रगती योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शिक्षेकेत्तर कर्मचार्‍यांना 1 एप्रिल 2010 च्या निर्णयानुसार मिळावा याकरिता मुंबई न्यायालयच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती त्याचा निकाल नुकताच लागला असून शासनाने 14 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करून शासकीय कर्मचार्‍या प्रमाणे माध्यमिक शाळेतील शिक्षेकेत्तर कर्मचार्‍यांना सुद्धा 12 व 24 वर्षानंतर आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सेवानिवृत्ती नंतरचे फायदे जसे वाढीव पेन्शन, उपदान, अंश राशीकरण व इतर सर्व फायदे 6 महिन्याच्या आत आश्वासीत केले आहे. माध्यमिक शाळेतील शिक्षेकेत्तर कर्मचार्‍यांना याचा लाभ होणार असल्याने राजकुमार चैनानी यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला संघटनेच्या जुन्या चळवळीचे नेते बाबा गडगे(रायगढ) मोहन मोरे पाराजी मोरे (अहिल्यानगर) वाल्मिक सुरासे, आसाराम शेळके, सिंधे सर (संभाजीनगर), विनायक कुलकर्णी (पुणे), क्रांतीलाल डोंगरे (ठाणे ), शिंत्रे साहेब या शिवाय संबंध महाराष्ट्रातून सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मोठा समुदाय उपस्थित होता.

संबंधित बातम्या

Back to top button