अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते आज नवीन शो रूमचे उद्घाटन
नवीन शो रूमसह कल्याण ज्वेलर्सचा अमरावतीत विस्तार

अमरावती /24 मार्च : दागिन्यांच्या किरकोळ विक्री क्षेत्रातील प्रमुख कंपनी कल्याण ज्वेलर्सने पूर्व महाराष्ट्रातील विदर्भ भागात आपल्या कार्याचा धोरणात्मक विस्तार आज जाहीर केला आहे. यात अमरावतीत मौजे राजपेठ, सीमा मिलेनियम येथील नवीन शोरूमचा समावेश आहे. बुधवार, 25 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता याचे भव्य उद्घाटन होणार असून बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे यासाठी विशेष उपस्थित राहणार आहे. हे लाँच म्हणजे कल्याण ज्वेलर्सच्या महाराष्ट्रातील विस्तारातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जो विश्वासार्ह दागिन्यांच्या खरेदीच्या अनुभवाला ग्राहकांपर्यंत आणण्याच्या वचनबद्धतेला बळकटी देतो. अमरावतीतील नवीन शोरूममध्ये सोने, हिरे आणि मौल्यवान रत्नांच्या दागिन्यांचे विस्तृत प्रकार उपलब्ध असतील. जे ग्राहकांच्या बदलत्या गरजांना प्राधान्य देतानाच आधुनिक शैलीसह पारंपरिक कारागिरीला एकत्र केले आहे.




