भाजप नेत्या किरणताई महल्ले यांची राष्ट्रपतीकडून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी निवड

विदर्भातील कणखर नेतृत्वाची देशपातळीवर मोठी दखल

अमरावती / 17 मार्च : शहराच्या माजी महापौर आणि भाजपच्या धडाडीच्या नेत्या सौ. किरणमाई महल्ले यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी या निवडीवर शिक्कामोर्तब केल्याने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, एका अभ्यासू आणि तळागाळातील नेतृत्वाला आता राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
अमरावती जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून एक अतिशय आनं दाची आणि अभि मानाची बातमी समोर आली आहे. आपल्या का माचा ठसा उमटवणार्‍या सौ. किरणमाई महल्ले यांची दिल्ली येथील राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली असून, या नियुक्तीमुळे संपूर्ण विदर्भाचा सन्मान वाढला आहे. किरणताई महल्ले यांचा राजकीय प्रवास हा अत्यंत जिद्दीचा आणि प्रेरणादायी राहिला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, प्रदेश सचिव आणि अमरावतीच्या महापौर म्हणून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. केवळ सत्ता किंवा पद मिळवणे हा त्यांचा उद्देश कधीच नव्हता, तर राजाराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे गोरगरीब जनतेची सेवा केली आहे. महिलांचे सक्षमीकरण असो वा वंचितांना न्याय मिळवून देणे, किरणताई नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत.त्यांच्या या कार्याची दखल थेट देशाच्या सर्वोच्च पदावरून म्हणजेच राष्ट्रपती महोदयांकडून घेतली जाणे, ही त्यांच्या प्रामाणिक कष्टाची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी निवड पावती आहे. खेड्यापाड्यातील लोकांशी असलेली त्यांची नाळ आणि प्रत्येक प्रश्नावर असलेली त्यांची पकड यामुळेच त्यांना ही मोठी जबाबदारी मिळाली आहे. आगामी काळात त्या राष्ट्रीय स्तरावर मागासवर्गीय समाजाचे प्रश्न पोटतिडकीने मांडतील आणि देशाला आपल्या अनुभवाचा फायदा करून देतील, अशी खात्री सर्वांना वाटत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वंचितांच्या हक्काची खंबीर ढाल

समाजसेवेचा वारसा जपणार्‍या किरणताई महल्ले यांनी नेहमीच सर्वसामान्य आणि गरजू लोकांसाठी आपले दरवाजे उघडे ठेवले आहेत. आता दिल्लीतील या नव्या पदामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचे त्यांचे स्वप्न अधिक वेगाने पूर्ण होईल, यात शंका नाही.

संबंधित बातम्या

Back to top button