आराधना मॉलमध्ये खरेदीवर उपहारांची बरसात

ग्राहकांसाठी हबलाणी परिवाराची विशेष भेट

* पाच हजारांच्या खरेदीवर हमखास बक्षीस योजना

अमरावती /26 फेब्रुवारी – शहरातील कापड व्यवसायातील अग्रगण्य नाव असलेल्या ‘आराधना होलसेल शॉपिंग मॉल’ने ग्राहकांसाठी ‘प्रत्येक खरेदीवर खात्रीशीर भेट’ ही नवीन योजना सुरू केली असून, यामुळे खरेदीचा आनंद द्विगुणित झाला आहे. कोणत्याही सोडतीची किंवा स्पर्धेची वाट न पाहता, ग्राहक जेवढी जास्त खरेदी करतील, तितकेच आकर्षक उपहार त्यांना प्राप्त होणार आहेत. हबलाणी परिवाराने अमरावतीकरांच्या विश्वासाला दाद देण्यासाठी 21 फेब्रुवारीपासून ही योजना अमलात आणली असून, ग्राहकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत तत्पर असलेल्या आराधना मॉलने यापूर्वी ‘लाडकी बहीण’ योजनेद्वारे महिलांना भरघोस बक्षिसे दिली होती. आता ही व्याप्ती वाढवून सर्वच ग्राहकांसाठी मॉलने आपले दरवाजे उघडले आहेत. बिग बझार परिसरातील ’बीजलँड’ येथील शाखा आणि जवाहर रोडवरील मुख्य दालन अशा दोन्ही ठिकाणी ही योजना लागू आहे. किमान 5 हजार रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना हमखास भेटवस्तू दिली जात आहे. एकाच छताखाली बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा, सलवार सूट, तयार कपडे (रेडीमेड), मुलांचे कपडे, दागिने आणि पादत्राणे अशा सर्व वस्तू उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक हबलाणी परिवाराने केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button