रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत एकदिवसीय व्याख्यान

डॉ.राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अमरावती येथे

अमरावती /23 जानेवारी : शैक्षणिक, संशोधन व वैद्यकीय क्षेत्रात सदैव अग्रेसर असणार्‍या डॉ. राजेंद्र गोडे शैक्षणिक परिसर, अमरावती येथील डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च तर्फे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह त्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत एकदिवसीय व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम डॉ. राजेंद्र गोडे शैक्षणिक परिसर, अमरावतीचे अध्यक्ष योगेंद्रजी गोडे व सचिव तन्वी गोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमा प्रसंगी मंचावर डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अमरावती चे प्राचार्य डॉ. सागर सी. जिरापुरे यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक श्री. प्रतीक रोडे व श्री. दिनेश एकडे त्यासोबतच यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एम. आर. धर्मे आणि डीन अकॅडेमिक्स डॉ. एच. आर. धनबर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.उपस्थित वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा योग्य वापर व चारचाकी वाहनांसाठी सीट बेल्टचा वापर अपघाताच्या वेळी जीव वाचविण्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो, याबाबत त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे माहिती दिली. तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास होणारे धोके, अचानक ब्रेकिंगमुळे उद्भवणार्‍या समस्या आणि अतिवेगामुळे होणार्‍या अपघातांचे गंभीर परिणाम यावर त्यांनी विशेष भर दिला.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button