बळीराजासाठी 2500 कोटी रुपयांचा सामंजस्य करार

मुख्यमंत्री फडणवीसांचे शेतीपुरक व्यवसायांना प्राधान्य

नवी दिल्ली/22 जानेवारी  : स्वित्झर्लंडमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या शेतकरीकेंद्रित अनेक धोरणांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे. तसेच, राज्यात स्मार्ट शेतीला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महा राष्ट्र शासन, रुरल एन्हान्सर्स ग्रुप आणि न्यूट्रीफ्रेश फार्म टेक यांच्यासोबत अंदाजे 2500 कोटी रुपयांचा सामंजस्य करार (चेण) केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. रुरल एन्हान्सर्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अंबर आयदे आणि न्यूट्रीफ्रेश फार्म टेकचे सीईओ संकेत मेहता यांनी या कराराचे अंमलबजावणी केली आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग मंत्रालयाचे प्रधान सचिव एन. बालागन, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय सहसंचालक वेलारासू आणि रुरल एन्हान्सर्सचे प्रधान सल्लागार जयंत येरवडेकर उपस्थित होते. या करारानुसार, राज्यात हवामानावर आधारित स्मार्ट आणि तंत्रज्ञानाभिमुख शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. हा प्रकल्प 2026 पासून कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button