मानसिक रुग्णाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू
आर्वीच्या इंदिरा चौकातील घटना

* नागरिकांनी चोप देत मनोरुग्णास दिले पोलिसांच्या ताब्यात
आर्वी/21 जानेवारी – शहरातील इंदिरा चौक परिसरातील भाजी बाजारात बुधवार 21 रोजी सकाळी अंगावर शहारे उभे करेल अशी रतरंजित घटना घडली. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या 22 वर्षीय तरुणाने लाकडी पाटीने थेट तिघांवर हल्ला करून दोघांना ठार केले. एक व्यती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमेश गजानन लाडके ऊर्फ मत्या, रा. नेताजी वार्ड, आर्वी असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा मानसिकदृष्ट्या आजारी आहे. बुधवारी सकाळी त्याने त्याच्या आजीशी वाद घालून तिचा गळा आवळून ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी आरडा-ओरड केल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. त्यानंतर सकाळी 8 वाजताच्या सुमारास तो नग्नावस्थेत नेताजी वार्ड येथील राजू गुप्ता यांच्या घराजवळ पोहोचला. तिथे अंगणात खेळत असलेल्या गुप्ता यांच्या 8 वर्षीय चिमुकलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच गुप्ता कुटुंबीयांनी आरडा-ओरड केली असता मुलीला वाचविण्यासाठी काही व्यती धावून गेले. यावेळी प्रथमेशने एकावर हल्ला करून जखमी केले. कशीबशी मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटल्यावर आरोपीने तेथून पळ काढला.
त्यानंतर प्रथमेश हा हातात लाकडी पाटी घेऊन इंदिरा चौकात गभने यांच्या घराजवळ पोहोचला. त्याने याच परिसरातून जात असलेल्या रामकृष्ण श्रावण राऊत (70), रा. हनुमान वार्ड यांच्या डोयावर पाटीने वार केला. डोयाला गंभीर दुखापत झाल्याने राऊत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर इंदिरा चौकातील भाजी मार्केटमध्ये रामराव महादेव वांगे (85), रा. मारुती वार्ड यांच्यावर हल्ला केला. ते आपल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी बाजारात आले होते. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामकृष्ण राऊत यांना डॉटरांनी मृत घोषित केले. तर रामराव वांगे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रामराव वांगे यांचाही मृत्यू झाला. आरोपीला बांधून पोलिस ठाण्यात नेले-घटनेनंतर संतप्त जमावाने मनोरुग्ण प्रथमेशला चांगलाच चोप देत त्याचे हातपाय बांधून पोलिसांच्या स्वाधीन केले. तो त्याच्या वाटेत येणार्या्ंवर सतत हल्ले करत असल्याचे लक्षात येताच परिसरातील सुमारे 50 ते 60 नागरिकांच्या जमावाने त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याचे हातपाय बांधून लाकडी काठीला बांधण्यात आले. नंतर त्याला खांद्यावर उचलून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणातील आरोपीही जखमी झाल्याने त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




