मुंबई पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय राजधानींनाही मागे टाकेल
देवेंद्र फडणवीसांनी दावोसमध्ये सांगितला मुंबईच्या विकासाचा प्लॅन

* मुख्यमंत्र्यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत
झ्युरिक/18 जानेवारी – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी पाच दिवसांच्या दौर्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वित्झर्लंडमधील झ्युरिक येथे आगमन झाले. यावेळी परदेशात राहणार्या मराठी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा, ओवाळणी आणि महाराष्ट्र राज्यगीताच्या सुरांनी मुख्यमंत्र्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या प्रेमळ स्वागताबद्दल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित मराठीजनांचे मनापासून आभार मानले.
झ्युरिक आणि दावोस येथे आगमन होताच स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत मृदुलकुमार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि किंजारापू राम मोहन नायडू यांनीही त्यांची भेट घेत नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांतील यशाबद्दल अभिनंदन केले. मार्गात भेटणार्या अनेक नागरिकांनीही या दणदणीत विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात ‘स्वागत देवाभाऊ’ असा फलक विशेष आकर्षण ठरला. ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड’तर्फे झालेल्या स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्यात महा-एनआरआय फोरमच्या माध्यमातून स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक वैभव जपले तरच भौतिक प्रगती शक्य होते, असे नमूद करत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी पुढील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय राजधानींनाही मागे टाकेल असे नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट केले. जगभर मराठी माणूस मेहनती आणि विश्वासार्ह म्हणून ओळखला जातो, याचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी खा. नवनित राणा यांची तक्रार करणार्यांचा ‘यु-टर्न’
आलेले नगरसेवक आशिष अतकरे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी नवनीत राणा किंवा शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या विरोधात कोणतीही तक्रार केलेली नाही. तसेच पराभूत उमेदवार अॅड. अपर्णा ठाकरे, स्वाती निस्ताने आणि बादल कुळकर्णी यांनी देखील नवनीत राणा यांनी प्रचारात मोठी मदत केल्याचे मान्य केले आहे. राणा यांनी सभा घेऊन आम्हाला बळ दिले, त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणे चुकीचे असून त्या आमच्याच नेत्या असल्याचे या उमेदवारांनी ठामपणे सांगितले आहे. आधी तक्रार आणि नंतर त्यातून घेतलेला हा ’यू-टर्न’ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला असून, यामागे नेमका कुणाचा मेंदू आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राणा आमच्या खंबीर नेत्या -कथित तक्रार पत्राचा स्पष्ट शब्दांत निषेध करत आशिष अतकरे, अपर्णा ठाकरे आणि इतर सहकार्यांनी नवनीत राणा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. आमच्या पराभवासाठी राणा जबाबदार नसून त्या पत्रावरील स्वाक्षर्या पूर्णपणे बनावट आहेत. खोट्या अफवा पसरवून पक्षाची बदनामी करण्याचा हा डाव उधळला गेला आहे.




