शिंदे गटाच्या माजी आमदाराला अटक

मुंबई – शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदूरबार शहर पोलिसांनी अटक केली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर दरोडा आणि अ‍ॅचट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आला होता, त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे नंदूरबारमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. माजी आमदार चौधरी यांना अटक केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात माजी आमदार चौधरी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे नंदूरबारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.

संबंधित बातम्या

Back to top button