भाजपचे वर्चस्व संपृष्ठात येईल

अकोला– अकोला महा पालिकेच्या 80 जागांसाठी आज मतदान सुरू आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि पत्नी अंजली आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका बारकाईने पाहत आहे. ही निवडणूक भाजपची गेल्या दहा वर्षांची दादागिरी मोडणारी ठरणार आहे. ते म्हणाले की, भाजपला ‘वन पार्टी सिस्टीम’ हवी आहे, मात्र प्रत्यक्षात ही निवडणूक भाजपविरोधात होत असून जनतेला मल्टी पार्टी सिस्टीम हवी आहे. तसेच, कोणत्याही महापालिकेत एकहाती सत्ता येणार नाही आणि हेच चित्र मुंबई महापालिकेतही पाहायला मिळेल, असा त्यांनी दावा केला. दरम्यान, निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी पैसा वाटपाच्या घटना घडत असल्या तरी दुसरीकडे मतदार अशा लोकांना हाकलून लावत असल्याचे दिसून येत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी असेही नमूद केले की, ही बाब लोकशाहीसाठी सकारात्मक आहे.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं ईडीला दिलासा दिला आहे. पश्चिम बंगालच्या पोलि सांनी ईडी अधि कार्‍यां विरोधात दाखल केलेल्या एफआयआरला स्थगिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षासाठी काम करणार्‍या आयपॅक संस्थेच्या कार्यालयावर ईडीनं छापेमारी केली होती. त्या विरोधात पश्चिम बंगाल पोलिसांनी ईडीच्या अधिकार्‍यांवर एफआयआर दाखल केली होती. ईडीनं या प्रकरणी सुरुवातीला कोलकाता हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी सुनावणी घेत ईडीला दिलासा दिला. तर, पश्चिम बंगालचं सरकार यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करु शकत नाही.

संबंधित बातम्या

Back to top button