धर्मनिरपेक्ष व सर्वधर्मसमभाव बाळगून आपल्याला विकासासाठी पुढे जायचे
आ.सुलभा खोडके यांचे प्रतिपादन

* नवसारी प्रभागातील अस्मा कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेत घड्याळचा बोलबाला
अमरावती /8 जानेवारी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्ताधारी पक्षात सहभागी असली तरी,पक्षाने आपली पुरोगामी विचार व धर्मनिरपेक्ष विचारधारा कधीही सोडली नाही. राष्ट्रवादी सत्तेसाठी तडजोड करत नसून विकासासाठी आमचा लढा व संघर्ष आहे. सर्वधर्मसमभाव हाच विचार सदैव जपून आम्ही प्रत्येक समाज घटकासाठी काम करत आलोय व काम करत राहू, असा विश्वास अमरावतीच्या आमदार- सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला. अमरावती महानगर पालिका निवडणूक 2026 मधील राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक- 3 नवसारी मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ स्थानिक अस्मा कॉलनी येथे आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव (संघटन ) आ.संजय खोडके ,माजी उपमहापौर शेख जफरभाई शेख जब्बार,अँड.शब्बीर हुसैन ,श्री.यश सुलभा संजय खोडके, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार- प्रशांत डवरे, संकेत महल्ले,सौ.प्रिया धनाडे, परवीन बानो मोहम्मद फारुख,आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना आमदार सौ.सुलभाताई खोडके म्हणाल्या कि, नवसारी प्रभाग म्हटला तर सर्वसमावेशक सुजाण जनता व पुरोगामी विचार व धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारा मोठा जनाधार आहे. या प्रभागात समाजहिताचे प्रश्न व मानवविकासाला केंद्रबिंदू मानून आम्ही मागील अनेक वर्षांपासून जनसेवेचे व्रत बाळगून सातत्याने विकासात्मक कामे व सामाजिक कार्य करत आलेलो आहोत. निवडणुकीपुरते राजकारण असते, मात्र विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी हीच परिवर्तन घडविण्याची खरी वेळ असल्याचे प्रतिपादन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले. यावेळी मंचावर उपस्थित प्रतिष्ठित मंडळींनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून अमरावतीच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. यावेळी सर्व उपस्थितांनी वारे घड्याळ..आली रे घड्याळ..अशी घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी माजी उपमहापौर- शेख जफरभाई शेख जब्बार यांची मंचावरील उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. दरम्यान या प्रचार सभेला संबोधित करतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव (संघटन ) आ.संजय खोडके यांनी सांगितले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार -अजितदादा पवार यांनी सरकारमध्ये राहून राज्यातील अल्पसंख्यांक समाजाचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व सुविधेकरीता बार्टी , सारथी. महाज्योती, अमृतच्या धर्तीवर अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे मार्टी ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अल्पसंख्यांक विकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर अल्पसंख्यांक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. अल्पसंख्यांक समुदायातील मुलांना परदेशात शिक्षणासाठी संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळाला म्ह्णून शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. अल्पसंख्यांक उमेदवारांकरिता पोलीस भरती प्रशिक्षण योजना, निवासी स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक समाजातील महिलांचे नवीन दोन हजारांहून अधिक बचतगट स्थापन करण्यात आले आहे, असे बरेचसे निर्णय घेण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत शहराच्या अल्पसंख्यांक बहुल भागात मोठा जनाधार निर्माण झाल्याने याचे रूपांतर आता मतदानात करण्याचे आवाहन आ.संजय खोडके यांनी केले आहे. या प्रचारसभेला हाजी मसूद साहब, खालिद मास्टर, फारुखभाई मंडपवाले, प्रमोद धनाडे, बबलू अंपायर, मोहम्मद रफिक जावेदभाई आदींसह नवसारी प्रभागातील पॅराडाईस कॉलनी , अस्मा कॉलनी भागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.




