राहुल बाबा, एवढ्या लवकर थकू नका

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारं वार होणार्‍या परा भवा मुळे आताच थकून जाऊ नये, कारण आगामी काळात बंगाल आणि तामिळ नाडू मध्येही त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागणार आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींना टोला लगावला. अहमदाबाद महानगर पालिकेच्या 330 कोटी रुपयांच्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शहा यांनी 2029 च्या लोकसभा निवडणुकीबाबतही मोठे भाष्य केले. देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अमित शहा म्हणाले की, 2029 मध्ये भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्तेत येईल.

संबंधित बातम्या

Back to top button