परदेश दौर्यात राहुल गांधी यांच्यावर पाळत
काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

मुंबई/25 डिसेंबर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौर्यांवरून देशातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा आणि आरोप प्रत्यारोप होत असतात. दरम्यान, इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौर्यांवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे.
परदेश दौर्यांदरम्यान, राहुल गांधींवर केंद्र सरकारकडून पाळत ठेवली जाते, असा आरोप सॅम पित्रोदा यांनी केला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुला खती दरम्यान, सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौर्यां वरून भाजपाकडून करण्यात येणारे आरोप फेटाळून लावले. तसेच परदेश दौर्यांदरम्यान भारतीय दूतावासा मधील लोक राहुल गांधींवर पाळत ठेवून असतात. तसेच अनेक परदेशी नेत्यांना राहुल गांधी यांची भेट घेऊ नका, असे सांगितले जाते, असा आरोप पित्रोदा यांनी केला.




