पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालयातर्फे मधमाशी पालन प्रशिक्षणाचे आयोजन

अमरावती/21 डिसेंबर – नवीन शैक्षणिक धोरणनुसार विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता व कौशल्य विकास वाढीस लागण्याच्या दृष्टीने पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय येथे दिनांक 22 ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये मधमाशी पालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती तर्फे सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले असून सदर प्रशिक्षणासाठी 100 पेक्षा अधिक विद्यार्थी व शेतकर्यांनी नोंदणी केलेली आहे. केंद्रीय मधमाशी प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक प्रा. हेमंतकुमार डुंबरे प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करणार्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मधमाशी पालनाचे तांत्रिक ज्ञान प्रात्यक्षिकासह मिळणार असून या क्षेत्रात उद्योजक बनू पाहणार्या युवकांना हे प्रशिक्षण सुवर्णसंधी असल्याचे मत कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल ठाकरे व उपप्राचार्य नितेश चौधरी यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.




