अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून समाजाने वैचारिक व संस्कारमय जीवनाचा अंगीकार करावा

आ.सुलभा खोडके यांचे प्रतिपादन

* संत गाडगे महाराज यांच्या 69 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

अमरावती /19 डिसेंबर : सात्विक वृत्तीची जोपासना व्हावी, मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व संवर्धन करणे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्कार अध्यात्मातून उदयास येतो. तर अनिष्ट-रूढी परंपरेचा त्याग करून, अंधश्रद्धा निर्मूलन करून पुरोगामी विचारांची शिकवण अनुसरणे हा विचार विज्ञानातून पुढे आला आहे. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड संस्कार संत गाडगेबाबांनी स्वतःवर प्रयोग करून एक क्रांतीदर्शी विचार समाजात रुजविला. संत गाडगेबाबा यांनी दिलेला दशसूत्री कार्यक्रम हाच खरा रोकडा धर्म आहे. बाबांच्या विचारातून समाजाचे वैचारिक व संस्कारिक प्रबोधन घडण्यास समाज परिवर्तन होणार असल्याचे प्रतिपादन आ.सौ.सुलभार्ता संजय खोडके यांनी केले. श्री.संत गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्ट गाडगे नगर अमरावतीच्या वतीने दिनांक 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत आयोजित श्री. संत गाडगेबाबाचा 69 वा पुण्यतिथी महोत्सव 2025 मध्ये आयोजित श्रीमद भागवत कथा सप्ताह प्रसंगी आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी भेट दिली. याप्रसंगी आमदार महोदयांनी बाबांच्या समाधीस्थळी पूजन,हारार्पण करून अभिवादन केले. यावेळी संत गाडगेबाबा मिशनचे विश्वस्त श्री. बापूसाहेब देशमुख यांनी आ.सौ.सुलभाताई खोडके यांचे स्वागत केले. यावेळी आ.सुलभाताई खोडके यांनी सांगितले कि, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छता, सामाजिक सुधारणा व मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारातून पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विकासाची जडण -घडण झाली आहे. अमरावतीमधील संत गाडगेबाबा समाधी स्थळ हे केवळ श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ न राहता सर्वानी याला आपली कर्मभूमी समजून संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वसा जोपासण्याचे आवाहन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले. संत गाडगेबाबा यांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र नागरवाडीचे इंद्रभुवन साकारण्यासाठी मागील 50 वर्षांपासून निष्काम सेवाभावाने कार्यरत श्री. बापूसाहेब देशमुख यांच्या आ.सुलभाताई खोडके यांनी शाल व पुष्प गुच्छदेऊन सत्कार केला. दरम्यान आमदार महोदयांनी बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवात सुश्री.महेश्वरी देवी यांच्या मुखारविंदूतून आयोजित भागवत कथा श्रवणाचा लाभ घेतला. ज्यामध्ये महेश्वरीदेवी यांनी रुख्मिणी विवाहाच्या प्रसंगाचे वर्णन करून संपूर्ण परीसर भक्तिमय करून सोडला. यावेळी यावेळी संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख, संचालक सागर देशमुख, समाजभुषण- भरत रेळे महाराज, संचालक गजानन देशमुख, व्यवस्थापक प्रकाश महात्मे, अतुल रेळे , गजानन जवंजाळ, सौ.मीनलताई योगेश सवाई आदींसह सेवाधारी व अनुयायी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे सागर देशमुख यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या

Back to top button