विधीमंडळ प्रवेशासाठी पासेसचा काळाबाजार

नागपूर /12 डिसेंबर  : गेल्या वर्षी काही आमदारांच्या तक्रारी नंतर अभ्यागतांसाठी दररोज प्रवेश पास देण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतरही यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विधीमंडळातील सुरक्षेचे नियम वारंवार मोडले जात आहेत.
पहिल्याच दिवशी 15 सदस्यांनी, तर दुसर्‍या दिवशी 8 सदस्यांनी काही व्यक्तींना विनापास विधीमंडळात प्रवेश दिल्याचे समोर आले होते. यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी विधानसभेच्या सदस्यांना चालू हिवाळी अधिवेशनात प्रवेश पासशिवाय अभ्यागतांना विधानभवन परिसरात आणू नये, असे निर्देश दिले होते. असे असतानाच आता विधान परिषदेतील शिवसेना सदस्य हेमंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी म्हणजे आज (12 डिसेंबर) विधीमंडळात परिसरात प्रवेशासाठी अभ्यागतांच्या पासेसची दीड हजारात विक्री होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button