भाजपा आमदाराला बसला विजेचा धक्का

ठाकरे आमदाराकडून एसआयटी चौकशीची मागणी

नागपूर /12 डिसेंबर : विधीमंडळाचे अधिवेशन म्हटले की, सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येतात. विरोधक विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन करतात. त्यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षावर आरोप करताना दिसतात. सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. मात्र आज (12 डिसेंबर) विधान परिषदेत एक अनपेक्षित घटना घडली आणि एकच हशा पिकला.
भाजपा आमदार प्रसाद लाड हे आज विधान परिषदेत समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून बोलायला उभे राहिले. यावेळी माईकला हात लावल्यानंतर त्यांना वीजेचा धक्का जाणवला. त्यांनी या संबंधीची तक्रार सभापती राम शिंदे यांच्याकडे केली. सभा गृहात माईकला हात लावताच वीजेचा धक्का लागण्याची ही दुसरी वेळ अस ल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल, असे वक्तव्यही प्रसाद लाड यांनी केले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर प्रसाद लाड यांच्या बाजूलाच बसलेल्या प्रविण दरेकर यांनीही हजरजबाबी टिप्पणी करत म्हटले की, तुम्हाला जर काही झालं, तर तुमचा पुतळा उभारू. तसेच प्रसाद लाड यांची आताच एक चौकशी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले. प्रविण दरेकर यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहातील वातावरण काही वेळ हलकफुलकं बनलं होतं. राम शिंदे यांच्या तक्रारीनंतर सभागृहात जे हलकफुलकं वातवरण बनलं होतं, त्यात सभापती राम शिंदे यांनी देखील हस्तक्षेप केला. प्रसाद लाड यांच्या दिशेने पाहत राम शिंदे म्हणाले की, तुम्ही सभागृहाचे लाड आहात, त्यामुळे तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुमची काळजी घेतली जाईल. प्रसाद लाड यांनी सांगितलेल्या तक्रारीमुळे सभागृहाची काही मिनिटे वाया गेली असली, तरी त्यांच्या तक्रारीची नोंद घेऊन उपकरणांची तपासणी करण्याचे आश्वासन मी देतो, असे राम शिंदे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या

Back to top button