मराठा आंदोलन आता दिल्लीच्या दारात

मुंबई– मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आता दिल्लीमध्ये भव्य राज्य व्यापी अधिवेशन घेण्याची घोषणा केली असून राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने राजधानीत दाखल होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मुंबईनंतर दिल्लीमध्ये धडक देत हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्यामुळे महायुती सरकारची चिंता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले. कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेत जाणूनबुजून अडथळे निर्माण केले जात असल्याचा त्यांचा आरोप होता.




