पाच दिवसाचा आठवडा, तरीही अधिकारी, कर्मचारी वेळेवर येईना

चांदुरबाजार तहसील कार्यालयात नागरिकांची हेळसांड

* मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याकडे पाठ

चांदूरबाजार /8 डिसेंबर – राज्य शासनाकडून शासकीय कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी चांदूरबाजार तहसील कार्यालयातील हजर राहत नाही तुरळ कर्मचारी वगळता बाकी कर्मचारी कार्यालयात वेळेत हजर नव्हते. दैनिक आपला मातृभूमी चे पत्रकार यांनी सोमवारला दहा वाजता चांदूरबाजार तहसील कार्यालयात फेरफटका मारला असता बरेचसे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात वेळेत हजर नसल्याचे निदर्शनात आले. शासकीय कर्मचार्‍यांच्या मागणीनुसार शासनाने कर्मचारी व अधिकार्‍यांना पाच दिवसाचा आठवडा करण्यात आला. मात्र कार्यालयात येण्याची वेळ मात्र अधिकारी व कर्मचारी विसरले तरीका हा सुद्धा सर्वसामान्य नागरिकांकडून चिंतनाचा विषय आहे. शनिवार रविवारची सुट्टी होऊन सुद्धा , चांदूरबाजार तहसील कार्यालयात बर्‍याचशा विभागात अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या वेळेवर कार्यालयात हजर राहिले नाही. फक्त काहीशे शिपाई व एक दोन विभागाचे नायब तहसीलदार व कर्मचारी हेच वेळेचे बंधन पाळून शासनाने नेमून दिलेल्या वेळेतच कार्यालयात हजर होते.
मात्र संजय गांधी निराधार विभा ग हा तर पूर्णतः निराधार झालेला दिसला. चक्क आवक जावक विभाग हा वेळेत उघडावा तो पण मात्र बंदच होता. आस्थापन विभागात सुद्धा तलाठी जीडी च्या आणि तहसील कार्यालयाच्या जीटी चे पूर्णतः खुर्च्या खाली होत्या. यात असे मानले जाते की वरिष्ठ अधिकार्‍यांचे अंकुश नसल्याचे सुद्धा दिसून येत आहे. काही दिवसाआधी पुरवठा विभागातील नाय तहसीलदार व इतर कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर नसल्याची दैनिक आपला आपली मातृभूमी या वृत्तपत्राने बातमी प्रकाशित केली होती पण त्या बातमीची कोणत्याच प्रकारे दखल घेतल्या गेली नाही. चांदूरबाजार तहसील कार्यालय नेहमीच ग्रामीण भागातील नागरिकांना काम राहते. मातृत्त तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिकारी व कर्मचार्‍यांची तासंतास वाट पाहावी लागते. आपल्या मनमर्जीप्रमाणे आलेले अधिकारी व कर्मचारी आल्यावर सुद्धा आपल्या टेबलवर कामाकरिता राहत नाही. व ग्रामीण भागातील नागरिकांना अधिकारी व कर्मचार्‍यांची आतुरतेने वाट पाहावी लागते. त्यातच काही निवडक कर्मचारी उलटे सर्वसामान्य नागरिकांना उलटी सल्ला देतात की कर्मचारी मीटिंगच्यात आहे बाहेर गेले अशी उलट सुलट सल्ला देतात. तरी तहसीलदार अशा लेट लतिफ अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करणार तरी का हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.सोमवारला सकाळच्या सुमारा पत्रकाराने फेरफटका मारले असता 10वा.10मिनिटांनी होऊन सुद्धा कोणतेच अधिकारी व कर्मचारी तहसील कार्यालयात हजर नव्हते चक्क पूर्ण कुलूप होते मात्र याची भान अधिकार्‍यांनी सुद्धा ठेवावी जेणेकरून नऊ वाजून45 मिनिटांनी आपल्या कार्यालयात हजर राहावे व वेळेत सर्वसामान्य नागरिकांचे समस्या निकाली निघेल.
चांदूरबाजार तहसील कार्यालया त बरेचसे विभा वेळेचे भान नसल्यामुळे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर नव्हते आपली कार्यालयाची वेळ नऊ वाजून 45 सव्वा सहा वाजेपर्यंत असल्याचे भान कर्मचार्‍यांनी ठेवावे चांदूरबाजार तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्वच नागरिकांना तहसील कार्यालयात नेहमीच कोणत्या कामानिमित्त कार्यालयात यावे लागते पण अधिकारी व कर्मचारी वेळेवर आधार नसल्यामुळे नाईला जास्त त्यांना आले पावले वापस जावे लागते नाहीतर अधिकारी व कर्मचार्‍यांची तासंतास वाट पाहावी लागते.
चांदूरबाजार येथील तहसीलदार यांना भ्रमणध्वनीहून संपर्क साधला असता त्यांनी वेळेचे बंधन असल्याचे सांगितले कार्यालयाची वेळ सकाळी 9. वाजून45 मिनिट ते 6वा15मि हा आहे आज येणार्‍या 9कर्मचारी व अधिकार्‍यांवर वेळेत कार्यालयात हजर नसल्याचे कारवाई सुद्धा करण्यात आली जर कोणते अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर झाले नाहीत तर तीन कारवायानंतर त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्यात येईल असे चांदूरबाजारचे तहसीलदार यांनी सांगितले-सोनल सूर्यवंशी,तहसीलदार आणि प्रशिक्षणार्थी , उपजिल्हाधिकारी चांदूरबाजार

संबंधित बातम्या

Back to top button