मनपा मालमत्ता कर शिबिरात 43.94 लाखांची भरघोस वसुली

अमरावती /6 डिसेंबर : महानगरपालिकेतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर वसुली शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर चाललेल्या या शिबिरात उत्तर झोन क्र.1 मधील मालमत्ता कर वसुल रु. 8.52 लाख, मध्य झोन क्र.2 मधील मालमत्ता कर वसुल रू.20.35 लाख, पुर्व झोन क्र.3 मधील मालमत्ता कर वसुल रू.4.83 लाख, दक्षिण झोन क्र.4 मधील मालमत्ता कर वसुल रु.1.31 लाख, पश्चिम झोन क्र.5 मधील मालमत्ता कर वसुल रु.8.93 असे एकूण 43.94 लाखांची वसुली करण्यात महापालिकेला यश आले.
महानगरपालिकेच्या कर विभागाने प्रलंबित मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने शहरातील विविध प्रभागांमध्ये हे विशेष शिबीर आयोजित केले होते. सकाळपासूनच करदात्यांची गर्दी दिसत होती. अनेकांनी ऑनलाइन आणि काउंटरद्वारे कर भरून महापालिकेच्या उपक्रमाला सहकार्य केले. मालमत्ता कर संकलन वाढवण्यासाठी महानगरपालिका पुढील काही दिवसांत आणखी शिबिरे आयोजित करण्याचा विचार करीत असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली. तसेच, कर नियमित भरणार्‍या नागरिकांचे आभारही व्यक्त करण्यात आले. शहरातील विकासकामांसाठी मालमत्ता कर ही प्रमुख महसुलाची तरतूद असल्याने या वसुलीमुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीला दिलासा मिळाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button