मातृभाषेला प्रथम प्राधान्य द्या

महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन

वर्धा/16 एप्रिलभारतीय भाषांचा अभिमान बाळगून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. इतर भाषांचा विरोध न करता मातृभाषेचा सन्मान राखणे आवश्यक आहे. जगातील कोणतीही भाषा शिका. परंतु, आपली भाषा प्रथम ठेवा. सेवाग्राम आश्रम भेटीदरम्यान महात्मा गांधी यांचा साधेपणा, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेच्या कार्यातून प्रेरणा मिळाली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या सहाव्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा उपस्थित होत्या.
राष्ट्रपती मुुर्मु पुढेे म्हणाल्या की, गांधीजींनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबतच देशाला सशत, आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करून त्यांनीं पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पदक विजेत्यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान व शिक्षणाचा उपयोग केवळ वैयतिक प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी करावा. नवकल्पना, मूल्याधारित शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांच्या आधारावरच विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकते, असे त्या म्हणाल्या. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठात विविध राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे आंतरभाषा संवाद घडून येतो. हिंदी ही समृद्ध भाषा आहे. हिंदीसह भारतीय भाषांचा प्रत्येकाने गौरव बाळगला पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधी इंग्लंडमध्ये शिकले. दक्षिण आफ्रिकेत त्यांनी सामाजिक चळवळ उभारली. परंतु, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींनी भारतीय भाषेलाच प्राथमिकता दिली. हिंदीच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

संबंधित बातम्या

Back to top button