बडनेरा येथे महिला दिन उत्साहात साजरा

बडनेरा /16 मार्च – नवी वस्ती बडनेरा येथील अंजु कॉलनी व आकाश विहार कॉलनी, नवी वस्ती येथे प्रथमच कॉलनी मधील सर्व महिलांनी एकत्र येऊन महिला दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रम च्या सुरूवातीला क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या फोटो चे पूजन करून हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती शुभांगी सावंग व गणवीर बाई यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गौरी टेकाडे यांनी केले.
युवा समाजसेविका श्रीमती पायल ताई वाघमारे यांनी आपल्या भाषणातून महिला दिनाचे महत्व सांगितले. या कार्यक्रमा चे मुख्य आयोजन निशा ताई ब्रामणे व केसर चोपडे यांनी केले. या प्रसंगी कॉलनीतील सरस्वता वासनिक, ललिता लोखंडे, प्रतिभा बोरकर, माया गवई, संगमित्रा मुन, वर्षा चक्रे, पुष्पा जवंजाळ, नेहा लोणारे, उषा बागळे, भारती रामटेके, अर्चना डोंगरे, पायल जाधव, रेणू पिल्ले, प्रणाली काकड, कौशल्या मेश्राम, रिंकु बांबोळे, रामटेके बाई, घोडेस्वार बाई, वर्षा दंदे, गायकवाड बाई, प्रीती डोंगरे, प्रीती गणवीर, श्रुती शृंगारे, साक्षी चोपडे, गार्गी ब्रामणे इत्यादी महिलांप्रमाणेच देवानंदभाऊ वाघमारे, जितेंद्रभाऊ सावंग, विनायकभाऊ दंदे, मनोजभाऊ टेकाडे, सुधीर मून आदि पुरुष मंडळीची सुद्धा ब-या प्रमाणात उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

Back to top button