तिवसा हत्याकांडातील दोन मारेकर्यांना राजकोटमधून अटक
विमलच्या हत्येचा कट राजकोट येथून

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश
तिवसा /24 फेब्रुवारी : स्थानिक तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारवाडी नजीक असलेल्या आयआरबी ट्रक लेबाय याठिकाणी राजकोट येथील ता. 20रोजी 30वर्षीय विमल संतोष अग्रावत याची चाकूने हत्या केल्याचीं घटना घडली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकाने शोध मोहीम राबवित रोजकोट येथून दोनजणांना ताब्यात घेतले आहे.तपासा दरम्यान विमलच्या हत्येचा कट जुन्या वैसमानातून राजकोट येथे रचल्या गेल्याचीं माहिती पुढे आली आहे.माहिर माजीदभाई सोलंकी, वय 22, रा हुसेनी चौक, राजकोट,राज वहिदभाई चव्हाण, वय 22, रा. नानावटी चौक, राजकोट असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांचे नाव असून हत्येसाठी वापरण्यात आलेली जीजे 03 पिडी 0911 क्रमांकाचीं बॅलेनो कार देखील जप्त करण्यात आली आहे.मागील डिसेंबर 2025 मध्ये मृत विमल याच्या अल्पवयीन बहिणीला राज चव्हाण याचा नातेवाईक असलेला सुजल नावाच्या मुलाने पळवुन नेले होते.ज्यामध्ये पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात पळवुन घेवुन जाण्यासाठी सुजलला राज चव्हाण व माहिर सोलंकी यांनी मदत केल्याने मृत विमल याचे राज व माहिर यांचे सोबत वैमनस्य वाढले होते. तसेच पॉक्सो प्रकरणात मृत विमल हा राज व माहिर यांना पैशांची मागणी करीत होता.परंतु दोघेही पैसे देत नसल्यामुळे विमल दोघांनाही शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत होता. दरम्यान पैसे न दिल्याच्या रागातून मृत विमलने ता. 14फेब्रुवारी रोजी राज चव्हाण याची चारचाकी वाहन त्यांचेच घरासमोर जाळली होती.त्यामुळे विमल आपला गेम करू शकतो अश्याच भीतीने राज चव्हाण आणि माहिर सोलंकी याने तळजोड करण्याच्या हेतूने मृत विमलशी संपर्क केला व भारवाडी येथे धारधार चाकूने राज आणि माहिरने विमलची हत्या केल्याचे चौकशीत सामोरं आले आहे.या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत,उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, तिवसा पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांच्या नेतृत्वात पीएसआय अमोल मुडे, सागर हटवार, मुलचंद भांबुरकर, अंमलदार बळवंत दाभणे, रविंद्र बावणे, भुषण पेटे, पंकज फाटे, गजेन्द्र ठाकरे, युवराज मानमोटे, रवी वर्हाडे, अमोल देशमुख, सुधीर बावणे, मंगेश लकडे, दिनेश कनोजिया, सचिन मसांगे, सागर नाठे, शाम सोनोने, चालक हर्षद घुसे तसेच सायबर येथील अधिकारी व अंमलदार पथकाने केला.
घटनास्थळी ऍक्टिव्ह मोबाईलमुळे प्रकरण उघडकीस-दुचाकीवर असलेला साथीदार माहिर सोलंकी हा मृत विमल यांच्या दुचाकीवर सोबत होता. रात्री चार वाजता दरम्यान दोघेही विश्रांती करण्यासाठी भारवाडी येथील ट्रक लेबाय येथे थांबले.यावेळी राज चव्हाण जीजे 03पिडी 0911क्रमांकाचीं बॅलेनो कार घेऊन घटनास्थळापासून काही अंतरावर होता.दोघांनी एकमेकांशी संपर्क करून सकाळी विमल झोपेतच असताना चाकूने हत्या केली.तीनही मोबाईल एकाच ठिकाणी ऍक्टिव्ह असल्याचे दिसताच पोलीसांनीं त्याच ट्रेसद्वारे तपास केला.




