व्हीएसआरच्या विमान उड्डाणावर बंदी
अजित पवार विमान अपघात प्रकरणी सर्वात मोठी कारवाई

मुंबई/24 फेब्रुवारी – अजित पवार यांचे बारामतीत विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर संबंधित विमान कंपनी व्हीएसआरवर कारवाई करण्यात यावी, त्या कंपनीच्या विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्या मागणीला आता यश आले आहे. विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीएने व्हीएसआर या हवाई वाहतूक कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. व्हीएसआरच्या विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी डीजीसीएने हे कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. व्हीएसआर कंपनीने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.




