तिवसा नगरपंचायत, दर्यापूर तहसिल अव्वल

पहिल्या टप्यातील जनगणना कामात

100 टक्के घरयादी, गटयादीचे कार्य पूर्ण, जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार

अमरावती /8 जून  : जिल्ह्यात जनगणनेच्या कामकाजाला सुरवात करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात तिवसा नगरपंचायती आणि दर्यापूर तहसिलने प्रथम ग्रामीण चार्ज कार्यालयाने मुदतीआधीच पहिल्या टप्प्यातील कार्य 100 टक्के पूर्ण केले आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते तिवसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवदास मुसळे आणि दर्यापूरचे तहसिलदार रविंद्र कानडजे यांचा आज प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जनगणना 2027 मधील पहिला टप्प्याचे कामकाज यशस्वीरित्या पुर्ण करणारे तिवसा नगरपंचायत हे जिल्ह्यातील प्रथम शहर चार्ज कार्यालय ठरले आहे. यानिमित्ताने तिवसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवदास मुसळे, कार्यालय अधिक्षक रोहन राठोड, जनगणना लिपीक सुधीर विघ्ने, तांत्रिक सहायक निलकमल बोके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यशस्वीरित्या कामकाज करणारे दर्यापूर तहसील हे जिल्ह्यातील प्रथम ग्रामीण चार्ज कार्यालय ठरल्याने दर्यापूर तहसीलचे तहसीलदार रविंद्र कानडजे, नायब तहसीलदार प्रमोद काळे, जनगणना लिपीक इमरान देशमुख, तांत्रिक सहायक अपेक्षा हिवराळे यांचा सत्कार करण्यात आला. जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यात घरीयादी, गटयादी बनविण्यात येत आहे. हा टप्पा दि. 16 मे ते 14 जून या कालमर्यादेमध्ये करण्यात येत आहे. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार कालमर्यादेप्रमाणे दि. 10 जूनपर्यंत कार्यक्षेत्रातील सर्व एचएलबीचे काम 100 टक्के पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र तिवसा नगरपंचायतीने दि. 4 जून 2026 रोजीच त्यांच्या शहर चार्जमधील सर्व एचएलबीचे काम पूर्ण केले आहे. या कामगिरीमुळे नगरपंचायत तिवसा हे जिल्ह्यासह अमरावती विभागातील 100 टक्के काम पूर्ण करणारे प्रथम कार्यालय ठरले आहे. तसेच ग्रामीण चार्ज कार्यालय दर्यापूर तहसील यांनी दि. 7 जून 2026 रोजी त्यांच्या चार्जमधील सर्व एचएलबीचे 100 टक्के काम पूर्ण केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button