हायकोर्टाने सफाई कंत्राट रद्द केल्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात
कोणार्क पाठोपाठ अमरावती महापालिकेचीही डङझ; पी. गोपीनाथ रेड्डी यांच्या विरोधात दोन स्वतंत्र याचिका

कोणार्कची याचिका ‘डिफेक्ट लिस्ट’मध्ये; मनपाची याचिका 24 सप्टेंबरला दाखल
अद्याप हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्याचे स्पष्ट आदेश नाहीत
अमरावती /24 सप्टेंबर -अमरावती महानगरपालिकेच्या बहुचर्चित सात वर्षांच्या एकत्रित स्वच्छता कंत्राटाचा वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित स्वच्छता कंत्राटाबाबत दिलेल्या निर्णयानंतर आता कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि अमरावती महानगरपालिका या दोघांनीही स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
उपलब्ध सुप्रीम कोर्ट केस स्टेटसनुसार कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने 22 सप्टेंबर 2026 रोजी याचिका दाखल केली, तर अमरावती महानगरपालिकेने 24 सप्टेंबर 2026 रोजी स्वतंत्र डङझ दाखल केली आहे. त्यामुळे स्वच्छता कंत्राटासंदर्भातील हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील कायदेशीर लढाई आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचली आहे.
कोणार्कची याचिका : डायरी क्रमांक 59002/2026
सुप्रीम कोर्टाच्या केस स्टेटसनुसार Konark Infrastructure Limited तर्फे 22 सप्टेंबर रोजी याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणाला Diary No. 59002/2026 देण्यात आला असून CNR क्रमांक SCIN 010590022026 आहे.या याचिकेत M/s P. Gopinatha Reddy, State of Maharashtra, Amravati Municipal Corporation Am{U Urban Enviro Waste Management Limited यांना प्रतिवादी करण्यात





