पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रुक्मिणी गणेश मंडळात आरती

प्रसिद्ध ‘बद्रीनाथ धाम’ चा हुबेहूब आणि भव्य देखावा पाहुन पालकमंत्री यांनी मंडळाचे केले कौतुक

नवनीत राणा आणि आ.रवी राणा यांची उपस्थिती

अमरावती /22 सप्टेंबर– गणेशोत्सवाच्या उत्साहात अमरावती शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून गणरायाचे दर्शन घेण्यासाठी विविध मंडळांना भेटी दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती शहरातील प्रमुख गणेश उत्सव मंडळांना भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील प्रसिद्ध रुक्मिणी गणेश उत्सव मंडळाला भेट देऊन विधिवत गणेश आरती केली आणि गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपच्या स्टार प्रचारक तथा अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार प्रवीण तायडे, भाजप नेते रविराज देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुक्मिणी गणेश उत्सव मंडळात यंदा साकारण्यात आलेला प्रसिद्ध ‘बद्रीनाथ धाम’चा हुबेहूब आणि भव्य देखावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाहिला. देखाव्याची आकर्षक मांडणी, भव्यता आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत पाहून त्यांनी मंडळाचे कौतुक केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक भावना जपतानाच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्याचे काम गणेश मंडळांकडून होत असल्याचेही यावेळी उपस्थितांनी सांगितले.पालकमंत्र्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने गणेश आरती झाल्यानंतर उपस्थित गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे मंडळ परिसरात भक्तिमय तसेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी जयंता डेहनकर, अविनाश काळे, भूषण फरतोडे, विक्की शर्मा, कार्यकारी अध्यक्ष भूषण फरतोडे, उपाध्यक्ष मनोज भोजने, मंगेश राऊत, पीयूष गावंडे, निहार लकडे, सचिव उदय देशमुख, सहसचिव आश्विन भेंडे, ओम राऊत, राहुल इंगोले, कोषाध्यक्ष संचित वैद्य, सहकोषाध्यक्ष यश धर्माळे, संयोजक वेदांत उगले, मोहित जवजाळ, संयोजक मयंक ताबुस्कर, प्रसिद्धी प्रमुख सारंग बुंदीले, ओम बुंदीले, आदर्श मानमोडे, प्रिन्स धर्माळे, भूषण जोशी, तुषार जगताप, प्रसाद भुगुल, रोहन पाटील, तेजस साखरकर, संजय नागरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button