बालगृहातील तीन मुलींच्या कुटुंबाचा शोध

अमरावती/8 ऑक्टोबर : येथील शासकीय मुलींच्या बालगृहात दाखल झालेल्या मोना, अनामिका आणि सोनी अकील यादव यांना भेटण्याकरिता आजपर्यंत त्यांचे आई -वडिल व नातेवाईक आलेले नाहीत. मुलींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांच्या कुटुंबियांचा शोध सुरु असल्याचे बालगृहाच्या अधिक्षकांनी कळविले आहे. नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत 12 ऑगस्ट 2026 रोजी मोना ही बालिका,भातकुली पोलीस स्टेशन मार्फत 4 सप्टेंबर 2025 रोजी अनामिका ही बालिका तर अमरावती रेल्वे पोलिसांमार्फत 14 ऑगस्ट 2026 रोजी सोनी अकील यादव ही बालिका बाल कल्याण समि तीच्या आदे शाने शासकीय मुलींच्या बाल गृहात दाखल झाल्या आहेत. मोना ही बालिका दामिनी पथकाला नांदगाव पेठ जवळील मंदिरात आढळून आली.तिचे वय साधारणत: 16 ते 18 वर्षा दरम्यान असून उंची 144 सेमी तर वजन 36 किलो ,वर्ण सावळा आहे. अनामिकाही ही माईल्ड मतिमंद असून तिचे वय 12 ते 16 वर्षा दरम्यान आहे. तिचे वजन 15 किलो,उंची 135 सेमी आणि वर्ण सावळा आहे. ती फक्त तुरळक हिंदी शद्ब बोलते.सद्य: स्थितीत तिला मोझरी येथील मतीमंदाच्या शाळेत पाठविण्यात आले आहे.बालिकेच्या कुटुंबियांचा शोध घेण्याबाबत भातकुली पोलीस स्टेशनला कळविण्यात आले आहे. सोनी अकील यादव ही बालिका जबलपूर रेल्वे मध्ये एकटी भटकतांना आढळल्याने तीला अमरावती रेल्वे पोलिसांमार्फत बालगृहात दाखल करण्यात आले





