अमरावतीच्या बालरोगतज्ञांची उल्लेखनीय कामगिरी

अमरावती/16एप्रिल: मेहकर येथे आयएमए सदस्यांसाठी आयोजित परिषदेत अमरावतीच्या बालरोगतज्ञांनी उल्लेखनीय
कामगिरी केली. पहिल्या सत्रात शहरातील वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉ सतीश अग्रवाल यांनी पर्यावरणाचा लहान बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणामांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाचा गर्भस्थ अर्भकावरही दुष्परिणाम आढळलेत. दुसर्‍या सत्रात डॉ सतीश अग्रवाल यांनी लिहिलेल्या पटकथेवर कोर्टरूमचे नाट्यरूपांचे मंचन झाले. यात शहराचे वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉ सतीश तिवारी यांनी जज्ज म्हणून तर डॉ अग्रवाल यांनी वकीलाची भूमिका पार पाडली. इतर सहभागी म्हणून डॉ मंजूषा गिरी, डॉ सुभाष खुरद, डॉ अमित ताजने, डॉ गीता व गजानन शेलके, डॉ वर्षा लखोटिया व डॉ गजानन उमालकर यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या. कॉन्फ्रेंसच्या सफलतार्थ डॉ संतोष गावडे, डॉ सुभाष खुरद, डॉ श्रीकांत राठोड, डॉ निलेश गट्टानी, डॉ सावजी, डॉ झंवर, डॉ अनिल राठोड, डॉ उमेश जाधव, डॉ आशिष नरवाडे, डॉ योगिता शेजोळ, इ नी श्रम केले. या कामगिरीबद्दल आयएपी अमरावती शाखेचे डॉ प्रतिभा काळे, डॉ आदित्य टांक, डॉ सूरज बंसोड सहित सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

Back to top button