राहुल गांधींनी स्टँड-अप कॉमेडी करावी

मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल
नागपूर /20 सप्टेंबर; राहुल गांधींच्या ’छात्रो की गूंज’मध्ये पंतप्रधान मोदींची मिमिक्री करण्यात आली. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. मला असं वाटतं की आता राहुल गांधींना हेच काम उरलं आहे. राहुल गांधींनी स्टँड अप कॉमेडीचं काम हाती घ्यावं. तिथे मिमिक्री केली तर त्यांना खूप चांगल्या प्रकारचा रोजगार मिळू शकेल. इथे तर त्यांनी त्यांच्या पार्टीला बेरोजगार करुन ठेवल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ते नागपूरमध्ये बोलत होते.
युपीआय पेमेंटवरील शुल्काला पेट्रोल पंप चालकांनी विरोध सुरू केला आहे. 2000 रुपये अथवा त्यापेक्षा अधिक युपीआय पेमेंट ते स्वीकारणार नाही. ग्राहकांकडून रोख रक्कम स्वीकारली जाईल, अशी भूमिका पेट्रोल पंप चालकांनी घेतली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युपीआयवरील शुल्क वाढीविरोधात पेट्रोल पंपचालकांनी 15 ऑक्टोबरपासून 2000 च्या वर युपीआय पेमेंट घेणार नाही, अशी भूमिका घेणं अयोग्य आहे. शेवटी युपीआयमुळे त्यांचा व्यवसाय वाढला आहे, त्यांचे व्यवहार पारदर्शक झाले आहेत असे मुख्मंत्री म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते.
लोक युपीआयचा त्याचा मोठ्याप्रमाणावर वापर करत आहेत. अशावेळी अतिश्य माफक शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क लावत असताना संसदीय समितीने त्याची शिफारस केली. या समितीमध्ये पी. चिदंबरम यांच्यासह काँग्रेसचे चार मोठे नेते होते. या समितीने हे शुल्क लावायला लावले आहे. सगळ्या व्यवहारांवर हे शुल्क नाही. काही विशिष्ट व्यवहारांवरच हे शुल्क आहे. तरीही एकप्रकारे नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. आज आपला व्यवहार वाढण्यामागे आणि भ्रष्टाचार कमी होण्यात युपीआय आणि डिजिटल व्यवहारांचा वाटा आपण लक्षात घेतला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.





