तिवसा मतदार संघातील प्रलंबित विषयांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्ष वेधणार

आ.राजेश वानखडे यांचा अधिवेशनात पाठपुरावा करण्याची ग्वाही

* तीर्थक्षेत्रास ब दर्जा, आरोग्य सुविधेला प्राधान्य

तिवसा /23 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्याचे वर्ष 2026-27 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबई येथील विधानभवनात सुरू होत आहे. तब्बल एक महिना चालणार्‍या या महत्त्वपूर्ण अधिवेशनात तिवसा विधानसभा मतदार संघातील प्रलंबित विकासकामांसाठी आमदार राजेश वानखडे यांनी सशक्त पाठपुरावा करण्याची तयारी केली आहे.
मतदार संघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तारांकित प्रश्न,लक्षवेधी सूचना व विविध संसदीय आयुध वापर करणार असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले.अधिवेशनात आ. राजेश वानखडे यांनी खालील प्रमुख मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहे.यामध्ये तिवसा येथे नवीन शासकीय पॉलिटेक्निक व नर्सिंग कॉलेजची स्थापना,माहुली जहागीर वलगाव, नेर पिंगळाई, कुर्‍हा, खोलापूर येथे आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन, तिवसा एमआयडीसीचे विस्तारीकरण, नांदगाव पेठ येथे एमआयडीसीमध्ये उद्योग व रोजगार निर्मिती, मोझरी विकास आराखडा, वलगाव विकास आराखडा व कौंडण्यपूर विकास आराखड्यातील इमारतींचे हस्तांतरण न झाल्याने झालेल्या दुरवस्थेचे निराकरण व नवीन बांधकाम प्रस्तावांना मान्यता देऊन निधीची उपलब्धता.
नेर पिंगळाई येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करून मोर्शी तहसीलवरचे अवलंबित्वक कमी करून नागरिकांना सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे तसेच अमरावती तहसीलचे विभाजन करून अतिरिक्त अमरावती ग्रामीण तहसील कार्यालय निर्माण करणे,105 गावे वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या उर्वरित कामांना निधी उपलब्ध करणे,अस्तित्वातील मंजूर 300 किलोमीटर शेत पांदण रस्ते व वाढीव शेत पांदण रस्त्यांच्या मंजुरीसाठी सार्थक प्रयत्न,अशे विविध मुद्दे व प्रश्न येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार राजेश वानखडे उपस्थित करणार आहे.

मतदार संघातील प्रत्येक गाव व प्रत्येक नागरिकाच्या विकासाची जबाबदारी स्वीकारून तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, चर्चा व इतर संसदीय आयुधांच्या माध्यमातून या सर्व प्रलंबित विषयांवर साधक-बाधक चर्चा घडवून आणणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली हे सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावून मतदार संघाला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे.
-राजेश वानखडे, आमदार तिवसा.

मतदार संघातील तीर्थक्षेत्रास ब दर्जा..

तिवसा मतदार संघातील सिद्धिविनायक गणपती वायगाव, गायत्री माता संस्थान सार्सी, महारुद्र हनुमान संस्थान जहागीरपुर व आसरा माता देवस्थान सावंगा आसरा या चार प्रमुख तीर्थक्षेत्रांना ब वर्ग तीर्थक्षेत्रांतर्गत मंजूर निधी उपलब्ध करून विकासकामे करून तीर्थकरू व भाविकांना सुविधा उपलब्ध करून देवस्थानचा विकास करणे ही प्राथमिकता असल्याचे नमूद केले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button