देशभक्ती गीतांनी रंगला स्वातंत्र्यदिन; आंतर महाविद्यालयीन गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती /17 ऑगस्ट– श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावतीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आंतरमहाविद्यालयीन देशभक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील एकूण 36 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणामुळे महाविद्यालय परिसरात उत्साहाचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे संचलन धिरज जमधाडे यांनी केले. स्पर्धेची धुरा प्रा. वसंत गेडाम व डॉ. दीपक पाडेकर यांनी सांभाळली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विरेंद्र डेरे, डॉ. प्रशांत पेशटीवार व श्री आशिष अढाउ यांनी सहकार्य केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून आर.टी. एन्टरटेनमेंट म्युझिक अकादमीचे संचालक श्री. राहुल तायडे यांना आमंत्रित करण्यात आले होते.एकल गीत स्पर्धेत श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावतीच्या कु. प्रांजल इंगळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पि.आर. पोटे पाटील कृषि महाविद्यालय, अमरावतीचे रोहन वैद्य द्वितीय, तर श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावतीच्या कु. संस्कृती गोपाल लोहंबरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.युगल गीत स्पर्धेत श्री शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या कु. सानिका भिवरकर व कु. दिव्या फुलारी यांनी प्रथम क्रमांक, तर ओम राउत व होष्णवी राउत यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.समूह गीत स्पर्धेत सौ. वसुधाताई देशमुख कृषि महाविद्यालय, बोडना येथील ओम दंदाळे, रोहित पडघन व कु. समीक्षा वानखडे यांच्या समूहाने प्रथम क्रमांक मिळविला. श्री शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या कु. सानिका भिवरकर, कु. दिव्या फुलारी, कु. शर्वरी बेलसरे व रेणुका बिजवे यांच्या समूहाने द्वितीय क्रमांक पटकावला.उत्तेजनार्थ पुरस्कार भावेश रेवतकर, सलोनी कोकाटे तसेच ओम राउत व होष्णवी राउत यांना प्रदान करण्यात आला.




