पी.आर. पोटे पाटील सीबीएसई बारावीचा निकाल शंभर टक्के
सातत्यपूर्ण गुणवत्तेची परंपरा कायम

अमरावती/13 मे: येथील पी. आर. पोटे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी सीबीएसई परीक्षेच्या निकालात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सन 2025-26 च्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून, ग्रामीण भागातील मातीचा सुगंध आणि जिद्दीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. शाळेच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाची लाट उसळली आहे. यंदाच्या परीक्षेत महाविद्यालयातील एकूण 80 विद्यार्थी सामोरे गेले होते, त्या सर्वांनी मोठ्या दिमाखात यश मिळवले. विशेष म्हणजे, तब्बल 27 विद्यार्थ्यांनी 80 ते 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून गुणवत्ता यादीत आपले नाव कोरले आहे. यामध्ये राजेश्वरी रवींद्र राठोड हिने 96.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर पार्थ सुमित चांडक याने 95.00 टक्के मिळवून दुसरे स्थान मिळवले. अथर्व विजय वानखडे आणि नवीशा संदीप दानखडे यांनी प्रत्येकी 93.20 टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळवत यशाचा गुलाल उधळला.या विद्यार्थ्यांच्या यशात सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रसाद मुरलीधर वाडेकर (92.80%), मल्हार जीवन डाळके (92.40%), हिमांशू संजय महल्ले (91.00%), यश नितीन दातीर (90.40%) आणि मयंक शैलेश हटवार (90.20%) यांचा समावेश आहे. याशिवाय अनुष्का किशोर पखाणे (89.40%), सर्वज्ञ नितीन कडू (89.20%), हेमांगी नरेंद्र भुजाडे (88.20%), आर्यन ज्ञानेश्वर वावरकर (88.00%), अधिराज हेमंतकुमार डिके (87.80%), आयुषी आशिष देशमुख (87.60%), ओजस्वी मंगेश राऊळ (86.60%), अग्रजा महेश साबळे (86.20%), गौतमी प्रतापराव अडसड व पृथ्वी निलेश ठाकरे (प्रत्येकी 85.00%), आशी मनीष अग्रवाल (84.80%), साहिल गणेशराव बोकडे (84.60%), आर्यमन विजय लेवटे व हर्ष राजेंद्र वारकरी (प्रत्येकी 82.80%), कृपा रवींद्र घुगे व वेदांत प्रवीण वानखडे (प्रत्येकी 82.60%), पृथा गजानन धर्माळे (82.40%) आणि मोहम्मद अबुजर (80.20%) यांनीही घवघवीत यश मिळवले.




