अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते कल्याण ज्वेलर्सचे थाटात उद्घाटन

दागिन्यांच्या खरेदीची सुवर्णसंधी

अमरावती/25 मार्च : विदर्भाच्या मातीत दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचा नवा अध्याय आज लिहिला गेला. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते राजपेठ येथील सीमा मिलेनियम परिसरातील कल्याण ज्वेलर्स’च्या देखण्या सुवर्ण दालनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. जागतिक दर्जाची घडणावळ आणि मराठमोळी परंपरा यांचा अपूर्व संगम असलेल्या या दालनामुळे आता अमरावतीमधील ग्राहकांसाठी दागिने खरेदीचा अनुभव अधिक सुखद आणि पारदर्शक होणार आहे. उद्घाटनावेळी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी कल्याण ज्वेलर्सच्या पारदर्शकतेचे तोंडभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या की, दागिन्यांच्या बाबतीत गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास हीच खरी श्रीमंती असते, जी कल्याणने जपली आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरमन यांनी अमरावतीतील या विस्ताराला महाराष्ट्रातील व्यापाराचा महत्त्वाचा टप्पा मानले आहे. येथे केवळ दागिने नव्हे, तर ग्राहकांचे सुखद क्षण साजरे केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दालनात लग्नसराईसाठी ’मुहूर्त’, हाताने घडवलेल्या ’मुद्रा’, मंदिरांच्या कलाकुसरीचे ’निमा’ आणि हिर्‍यांच्या दागिन्यांसाठी ’झिया’, ’अंतरा’, ’हीरा’ यांसारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार एकाच छताखाली उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, दागिन्यांच्या शुद्धतेसाठी ’बीआयएस हॉलमार्क’सह शुद्धतेचे चार स्तरांचे प्रमाणपत्र देऊन ग्राहकांना कायमस्वरूपी खात्री दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button