आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौर्‍यावर

शिक्षक मेळाव्यासह विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी

जिल्हा प्रशासन आणि कार्यकर्त्यांची जय्यत तयारी

अमरावती/2 एप्रिल : राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या, शुक्रवारी (दिनांक 3 एप्रिल) दोन्ही जिल्ह्यांच्या झंझावाती दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते अमरावती येथील विभागीय शिक्षक मेळावा आणि नागपूरमधील विविध धार्मिक व सामाजिक सोहळ्यांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या नियोजित दौर्‍यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह राजकीय वर्तुळात मोठी लगबग पाहायला मिळत आहे. पालक मंत्र्यां च्या स्वागता साठी कार्य कर्त्यांनी कंबर कसली असून, ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता महसूल मंत्री महोदय कोराडी येथील आपल्या निवासस्थानाहून नागपूर विमानतळाकडे रवाना होतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता ते हेलिकॉप्टरने अमरावतीकडे कूच करतील.करतील. दुपारी 12.35 वाजता अमरावतीच्या मोर्शी रस्त्यावरील संतज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भाजप शिक्षक आघाडी आणि शिक्षण संघर्षसंघटना यांच्या वतीने आयोजित विभागीय शिक्षक मेळावा व सत्कारसमारंभाला ते उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी डॉ. संगीता शिंदे (बोंडे)या संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button