अंबादेवी व एकवीरादेवी मंदिरात महाआरती

माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त

अमरावती/27 मे– जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.सुनील देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही युवक कॅांग्रेसतर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंबादेवी व एकवीरा देवी चरणी डॉ.सुनील देशमुख यांच्या उदंड आयुष्याकरिता महाआरती करण्यात आली. याप्रसंगी शहर कॅांग्रेसचे अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, माजी महापौर तथा महापालिकेचे विरोधी पक्षनेते विलासभाऊ इंगोले, माजी महापौर तथा स्वीकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे, माजी महापौर अशोकराव डोंगरे, विनोद मोदी, भरतराव देशमुख, डॅा.बळीराम ग्रेसपुंजे, अभिनंदन पेंढारी, राजूभाऊ भेले, सुरेश रतावा, गजानन रडके, शहर महिला कॅांग्रेसच्या अध्यक्षा जयश्रीताई वानखडे, नगरसेविका सौ. सुनीताताई भेले, डॅा.अर्चना आत्राम, कांचन खोडके, किरण चांदवडकर, भारती पिंपळे, सीमा तिवारी, नेहा बागडे, बाळासाहेब घोंगडे, प्रकाशभाऊ शिरभाते, दीपकभाई हुंडीकर, नेमराज देशमुख, गोपाल धर्माळे, दिनेश खोडके, प्रमोद इंगोले, विजय बर्वे, अनिल तायडे, महेश व्यास, विजय शिंदे, सोमेश्वर मुंजाळे, श्रीधर पुरोहित, निर्मल अहेरवार, समीर जवंजाळ, अनिकेत ढेंगळे, युवक कॅांग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, अनिकेत ढेंगळे, नितीन काळे, आशिष यादव, शुभम बांबल, शंतनू देशमुख, आकाश गेडाम, श्रेयस धर्माळे, वेदांत केने, नितेश वानखडे, केदार भेंडे, अनय वाटाणे, अनिकेत क्षीरसागर, सुमित मानकर, आनंद बरडे, आनंद पाचघरे, आशिष काळे यांच्यासह शहर कॅांग्रेस, महिला कॅांग्रेस, युवक कॅांग्रेस, एनएसयुआयचे पदाधिकारी व सन्माननीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button