ज्योतिबांची सावली-सावित्री माऊली नाटकातील कलाकारांचा सत्कार
माळी समाज ऋणानुबंधच्या वतीने आयोजन

अमरावती /29 मार्च : स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ज्योतिबाची सावली-सावित्री माऊली ह्या नाटकाचे 28 मार्च रोजी बहारदार सादरीकरण करण्यात आले. ह्या नाटकातील सावित्रीबाईची भूमिका अभिनयातून प्रभावीपणे साकारणार्या अभिनेत्री सौ. अपूर्वा सोनार व ज्योतिबांची भूमिका करणारे प्रा. जयकुमार चर्जन यांचा माळी समाज ऋणानुबंध टीमच्यावतीने पुष्पगुच्छ , श्रीफळ, शाल, फुले दाम्पत्यांची प्रतिमा आणि डॅा. प्रवीण बनसोड लिखित विचारपुष्प देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रा.श्रीकृष्ण बनसोड संपादित फुले- शाहू-आंबेडकरांच्या परिवर्तनवादी चळवळीतील समर्थ साथीदार असलेल्या वर्हाड विकास ह्या मासिक पत्रिकाचे विमोचन करण्यात आले.
‘ज्योतिबाची सावली-सावित्री माऊली’ हे दोन अंकी नाटक बघून माजीमंत्री वसुधाताई देशमुख यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम मुलींना ज्ञानाची कवाडे खुली करुन दिल्याचे तर माजी उपमहापौर डॅा. गणेश खारकर यांनी, महात्मा फुलें मानवतेसाठी लढा दिल्याचे म्हटले. समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांची, भारत सध्या पेशवाईकडे वाटचाल करीत असल्यामुळे जाती-धर्माच्या यादवीतून महात्मा फुलेंचे विचारच देशाला वाचवू शकतात असे म्हटले तर मुख्य अभियंता श्री. प्रदीप खवले यांनी नाट्य कलावंताचे कौतूक केले. सर्वशाखीय माळी समाज ऋणानुबंधच्या वतीने नाट्य कलावंत, निलेश रसे, रोशन तडस, सचिन करडे, राहूल चर्जन, शिला चर्जन, योगेश रायजादे, अनुराधा भुस्कट, चित्रा रथे, वृंदा तडस, वर्षा भूयार, मोनिका मेहरे, शैलेश काळे, आशिष पटारे, चेतन साबणकर, मनिष विधाते, जय हावरे, ज्ञानेश भुस्कट, मायरा मेहरे आदिंचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी सर्वश्री ओमप्रकाश अंबाडकर, डी.एस. यावतकर, प्रा.एन.आर. होले, वसंतराव भडके, मधुकर आखरे, प्रदीप लांडे तसेच डॅा. उज्ज्वला मेहरे, रजनी आमले, अरुणा खारकर, अनिता खवले, लता चिंचोळकर, कल्पना होले, सुनंदा बनसोड, सुनंदा आखरे सह माळी समाज ऋणानुबंधच्या पदाधिकारींची बहुसंख्येने उपस्थिती होती. वैभव निमकर यांनी बहारदार सूत्र संचालन केले.




