शार्दुल गोळे यांची विदर्भ मीडिया प्रमुख नियुक्ती

शिवसेना राष्ट्रीय कामगार सेनेत

अमरावती/ 29 मार्च – विदर्भाच्या राजकीय आणि पत्रकारिता वर्तुळात सध्या एकाच नावाची चर्चा रंगली आहे. ज्येष्ठ पत्रकार, कसलेले अभिनेते आणि चित्रपट निर्माते शार्दुल गोळे यांची शिवसेना (एकनाथ शिंदे) भारतीय कामगार सेनेच्या विदर्भ मीडिया प्रमुख पदी धडाक्यात नियुक्ती झाली आहे.
अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. आजवर कोणत्याही अधिकृत राजकीय पदावर नसतानाही आपल्या चाणाक्ष सल्ल्यांनी अनेक पक्षांना दिशा देणार्‍या गोळे यांच्याकडे आता थेट विदर्भाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सोहळ्याला शिवसेना नेते नानासाहेब बचाव आणि बाबासाहेब चव्हाण यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले, तर विदर्भ प्रमुख आकाश होरोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नियुक्तीसाठी खास शाबासकीचा संदेश धाडला असून, विदर्भातील राबणार्‍या हातांना आणि काळ्या आईची सेवा करणार्‍या शेतकर्‍यांना आता प्रबळ माध्यमाचे कवच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. शार्दुल गोळे यांनी पदभार स्वीकारताच अमरावतीसह नागपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली या आठही जिल्ह्यांत माध्यमांची भक्कम फळी उभारण्याचे काम हाती घेतले आहे. कार्यकर्त्यांना माध्यमांचे धडे देणे आणि सरकारच्या लोकोपयोगी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हे त्यांचे मुख्य लक्ष्य आहे. त्यांच्या या एन्ट्रीमुळे विदर्भातील राजकारणाला आता नवी धार चढणार असून, अनेक दिग्गजांच्या नजरा या नव्या वाटचालीकडे लागल्या आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button