नेत्रदान हेच सर्वात मोठे दान

महापौर म्हणाले ः ‘माझ्या जीवनाची अंतिम भेट - राष्ट्राच्या नावावर’

हरिणा फाऊंडेशनचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

अमरावतीत कृतज्ञता सोहळ्याचे भव्य आयोजन

अमरावती /11 जून नेत्रदानाचा कार्य हे स्वतःमध्येच एक खूप मोठे दान आहे. ज्या कुटुंबांनी या पवित्र कार्यात आपले योगदान दिले आहे, त्या सर्व कुटुंबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, असे आवाहन अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी केले.
स्थानिक राजकमल चौक येथे बुधवार, 10 जून रोजी हरिणा फाउंडेशन व हरिणा नेत्रदान समितीच्या वतीने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त ’माझ्या जीवनाची अंतिम भेट – राष्ट्राच्या नावावर’ अभियानांतर्गत नेत्रदान, अवयवदान व देहदान करणार्‍या कुटुंबांसाठी कृतज्ञता सोहळा आणि भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे, आयोजन समितीचे अध्यक्ष पुरणलाल हबलाणी, संयोजक निलेश चिठोरे, मनोज राठी व एलआयसीचे एसडीएम देशमुख उपस्थित होते. अभिनेते भारत गणेशपुरे यांनी हिरवी झेंडी दाखवून राजकमल चौकातून जनजागृती पदयात्रेचा शुभारंभ केला. ही पदयात्रा श्याम चौक, बापट चौक, प्रभात टॉकीज, जवाहर रोड, सरोज चौक, जयस्तंभ चौकमार्गे परत राजकमल चौकात आली. येथे आमदार रवी राणा व यश खोडके यांच्या उपस्थितीत पदयात्रेचा समारोप झाला. या प्रसंगी डिजिटल नेत्रदान संकल्पासाठी क्यूआर कोड व सेल्फी पॉईंट्स तयार करण्यात आले होते. सोहळ्यात कै. सिद्धार्थ काळपांडे, कै. निर्मलादेवी गांधी, कै. प्रमोद अग्रवाल, कै. उमादेवी बजाज, कै. अमृतलाल मुंडवाणी, कै. गोपाल मंत्री, कै. गुरुमुखदास फोटोणी, कै. मीनादेवी मिराणी यांच्यासह एकूण 40 हून अधिक अवयव व नेत्रदात्यांच्या कुटुंबांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अनुपस्थित सदस्यांच्या घरी जाऊन सन्मान केला जाईल, असे समितीने सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे डॉ. डी. जी. अडवाणी, नंदकिशोर राठी, जयराज बजाज, पुष्पलता राऊत, दिनेश सेठिया, कैलास गिरोळकर, जय हेमराजानी, समीर कुबडे, रवींद्र इंगळे, प्रवीण ढवले, अनिकेत देशमुख व सीए अंकित राजभूत यांच्यासह महानगर चेंबर, झुलेलाल सिंधी सेवा ग्रुप, माऊली वुमन फाउंडेशन आणि इतर अनेक सामाजिक संस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित बातम्या

Back to top button