आयएपी अमरावती शाखेद्वारे डॉ.सतीश अग्रवाल यांचा सत्कार

अमरावती /27 मार्च : इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, आयएपी अमरावती शाखेच्या पदग्रहण समारंभी शाखेचे निवर्तमान अध्यक्ष डॉ शैलेश जयस्वाल व वर्तमान अध्यक्ष डॉ प्रतिभा काळे यांच्या हस्ते शाखेचे माजी अध्यक्ष व शहरातील वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉ सतीश अग्रवाल यांचे सत्कार करण्यात आले. डॉ सतीश अग्रवाल मागील अनेक वर्षांपासून केंद्रीय आयएपीच्या विविध मॉड्यूल्सचे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. त्यांनी आयएपीच्या विविध शाखांमध्ये विभिन्न पदांवर यशस्वीरित्या काम केले. याच वर्षी त्यांची केंद्रीय पर्यावरण समूहाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. डॉ अग्रवाल यांना यावर्षी मेडिकोलीगल मॉड्यूलचे केंद्रीय संयुक्त समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले. ते अनेको सामाजिक संस्थांशी संलग्न असून त्यांनी जनजागृतीच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले आहे. या नियुक्तीबद्दल त्यांनी केंद्रीय आयएपीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नीलम मोहन, सचिव डॉ रुचिरा गुप्ता, आगामी अध्यक्ष डॉ सिंगरवेलू, कोषाध्यक्ष डॉ आलोक भंडारी व निवर्तमान अध्यक्ष डॉ वसंत खळतकर यांचे आभार मानले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ संजीव जोशी, डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ ए टी देशमुख, डॉ विल्हेकर, डॉ पुष्पा जुनघरे, डॉ सतीश तिवारी, डॉ संध्या काळे, डॉ जयंत पांढरीकर, डॉ संदीप दानखडे, डॉ राशीद खान, डॉ आदित्य टांक, डॉ निलेश पाचकवडे, डॉ सूरज बनसोड, डॉ पंकज चौधरी, डॉ हिमांशू रायचदानी इ उपस्थित होते. याप्रसंगी डॉ प्रवीण काळे यांनी जीवनपद्धती आणि आरोग्य या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन डॉ विनम्र काळे आणि डॉ गौरी पवार यांनी केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत बालरोगतज्ञ व इतर डॉक्टर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button