मोर्शीतील अर्धवट पुलासाठी काँग्रेसचा रस्ता रोको

17 एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन

मोर्शी /17 मार्च : येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी आज स्थानिक नागरिकांनी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.
श्रिनित दिवाकर राऊत यांच्या नेतृत्वाखाली या पुलाच्या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर आजच्या आंदोलनाची दखल घेत संबंधित प्रशासनाने 17 एप्रिल 2026 पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या कामासाठी 16 मार्च 2026 रोजी ङज- (ङशीींंशी ेष -ललशिींरपलश) निर्गमित करण्यात आले असून करार प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, या अपूर्ण पुलामुळे आतापर्यंत सुमारे 15 अपघात घडले असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी होती. काँग्रेस पक्षाच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. या आंदोलनात अ‍ॅड. यशोमतीताई ठाकूर, श्यामभाऊ बेलसरे, भुषण कोकाटे, सौ. अल्पजाताई बडासे, सौ. रमाताई इंगळे, मिलिंद कांबळे, समीरराव काळे, सचिन ठोके, आशिष गाडगे, मनीष ठाकरे, संजय कळसकर, चंदू जवंजाळ, श्याम ठाकरे, महेश राऊत, गजानन तायवाडे, विजय झाडे, पिंटू विधळे, राजूजी चौहान, संदीप रोडे, संजय सोनवणे, राजन लांडगे, गोविंद ठोक, राहुल चटले, गौरव खेरडे, वासिम कुरेशी, संजय ठाकरे, संदीप शेख, अतुल खोडस्कर, मोहन राजपूत, सौ. पुष्पाताई परतेकी, डॉ. गजानन चरपे, विजय लोखंडे, रंगरावजी बनसोड, मुरलीधरजी डहाणे, समाधान मोहोड, गजानन वानखडे, शिवा बनसोड, निलेश तट्टे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष नाही

यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या, सरकार नको तिथे पैसे देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अजिबात लक्ष नाही. अमरावती मुख्यमंत्र्यांचे आजोळ आहे. पण त्यांचे इकडे लक्ष नाही. त्यांचे लक्ष केवळ नागपुरात आहे. आठ-आठ वर्षं या ठिकाणी कामं होत नाहीत, आम्ही सरकारचा निषेध करतो, जर 17 तारखेपर्यंत जर काम सुरू झालं नाही तर परत आम्ही 18 तारखेला आंदोलन करू.
-यशोमतीताई ठाकूर, माजी आमदार तिवसा मतदार संघ

संबंधित बातम्या

Back to top button