पीडीएमसीचे डॉ.पटवारी यांच्यावर चौकशीविना गुन्हा दाखल
महिलेच्या प्रेतावरील दागिणे चोरी प्रकरणी

* पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले नाही
* चोर सोडून संन्याशाला फाशी
* डॉ.पटवारी पोलिस अधिकार्याचे सुपूत्र
अमरावती / 11 फेब्रुवारी – स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती महाविद्यालय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिण्यांच्या चोरी प्रकरणी डॉ. श्रेयस पटवारी व अन्य दोन कर्मचार्यांवर पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केल्या जात असुन पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बडनेरा येथील अनिल श्रीरामवार यांच्या पत्नी नलिनी श्रीरामवार यांची प्रकृती शनिवार 7 फेब्रुवारी ला सायंकाळी अचानक बिघडल्याने त्यांना तात डीने पीडीएमसी रुग्णा लयात दाखल करण् यात आले होते. डॉक्टरांनी
उपचार सुरू केले, मात्र रवि वारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच, जेव्हा नातेवाईकांनी नलिनी यांचा मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्या गळ्यातील मंगलसूत्र जागेवर होते, मात्र कानातील सोन्याचे महागडे झुमके गायब होते. मृतदेहावरील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच नातेवाईकांचा संयम सुटला आणि त्यांनी रुग्णालय परिसरात जोरदार हंगामा सुरू केला. डॉ. श्रेयस पटवारी यांना अन्य रुग्णांची तपासणी करायची असल्यामुळे ते वार्डातून गेले. त्यानंतर अनिल गणपतराव श्रीरामवार यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये डॉ. श्रेयस पटवारी व 2 अन्य अनोळखी व्यक्ती स्टाफ नर्स व 1 जेन्टस यांच्याविरोधात तक्रार केली. पोलीसांनी या तक्रारीची दखल घेवून डॉ. पटवारी व अन्य दोन व्यक्तींवर 147/27 कलम 303 (2), भा.न्या.सं. नुसार गुन्हाही दाखल केला. अनिल श्रीरामवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गाडगेनगर पोलीस अधिकार्यांनी थेट डॉ. श्रेयस पटवारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. वास्तविक फिर्यादींचे म्हणणे दाखल करुन पोलीसांनी चौकशी करणे क्रमप्राप्त होते. डॉ. श्रेयस पटवारी यांच्या म्हणण्यानुसार पोलीसांनी त्यांची प्राथमिक चौकशी केली. मात्र डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पवन टेकाडे यांनी सांगितले की, पोलीसांनी रुग्णालयाकडे कोणत्याही सीसीटीव्हीची मागणी केलेली नाही. ज्याअर्थी ही गंभीर घटना घडली आहे.तेव्हा पोलीसांनी घटना स्थळावर चौकशी करणे क्रमप्राप्त होते. तसेच डॉ. श्रेयस पटवारी यांनी मृतकाच्या कानातले दागिणे चोरले हा आरोप पोलीसांनी चौकशीविना मान्य केला. पत्नी वियोगात अनिल श्रीरामवार यांनी दिलेली तक्रार थेट ग्राह्य धरून एम.एस. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी डॉ. श्रेयस पटवारी यांच्यावर गुन्हा दाखल केला. वास्तविक श्रेयस पटवारी मुंबईच्या शासकीय रुग्णालयाचे एम.बी.बी.एस.चे विद्यार्थी असुन अमरावतीला पिडीएमसीत एम.डी. मेडीसीन अभ्यासक्रमासाठी आलेले आहेत. एका पदवीत्तर शिक्षण घेणार्या वैद्यकीय विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करतांना पोलीसांनी संवेदना बाळगायला हवी होती. ही बाब रुग्णालयाच्या वतीने एका पत्राद्वारे पोलीस अधिकार्यांना लेखी स्वरुपात कळविण्यात आली आहे. प्रत्यक्ष घटना घडली त्यावेळी नातेवाईकांचा रुग्णांच्या उपचाराबाबत कोणताही आक्षेप नव्हता. तसेच डॉक्टर बद्दल कोणतीही तक्रार नव्हती. मात्र प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीत डॉक्टरचा जाणीवपूर्वक केलेला उल्लेख नेमका कोणत्या हेतुने केल्या गेला. याचा तपास घेण्याची गरज आहे. डॉ. श्रेयस पटवारी यांचे वडील श्री. शंकर पटवारी पंढरपूर येथील श्री. विठ्ठल रुखमाई मंदीराचे सुरक्षा प्रमुख असुन वरीष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. पोलीसांनी पोलीसांच्या मुलाविरुध्द गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. शंकर पटवारी यांनी अमरावतीत धाव घेवून वरीष्ठ पोलीस अधिकार्यांच्या भेटी घेतल्या. पोलीस अधिकार्याच्या डॉक्टर चिरंजीवावर थेट चोरीचा आरोप झाल्यावर त्याची शहानिशा न करता गाडगेनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करावा. ही आश्चर्यजनक घटना समजल्या जात आहे.वैद्यकीय विद्यार्थ्याचे व्यावसायीक करीअर सुरु होत असतांना चुकीच्या व जाणीवपूर्वक तक्रारीवरुन थेट चोरीचे गुन्हे दाखल करणे ही बाब वैद्यकीय क्षेत्राला धक्कादायक असुन या प्रकरणाची सखोल व निपष्पपाती चौकशी होण्याची गरज आहे. अशी मागणी डॉ. श्रेयसचे वडील श्री. शंकर पटवारी यांनी केली आहे. मृत महिलेच्या शरीरावरील दागिणे कोणी काढले हा प्रश्न कायम असुन याबाबत एक कथित व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे.




